डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातंर्गत अतरमहाविद्यालयीने सांस्कृतिक युवा महोत्सव मयूरपंख येथील सांगुळवाडी महाविद्यालयात रंगणार आहे. 5 ते 8 ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या महोस्तवात कोकणातील 28 कृषी महाविद्यालयातील 1 हजारहून अधिक विध्यार्थीं सहभाग होणार आहेत.
दापोली कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून दरवर्षी अतरमहाविद्यलयीन सांस्कृतिक युवा मयूरपंख महोत्सवचे आयोजन केले जाते. या वर्षी या महोत्सवाचे यजमानपद येथील सांगुळवाडी कृषी महाविद्यालयाला मिळाले आहे.
मोहत्सवाच्या निमित्ताने विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, गायन, तालवाद्य, शास्त्रीय नृत्य, लोकनृत्य, प्रश्नमंजूषा, भाषण, वादविवाद स्पर्धा, नाटक, मूकनाट्य, नक्कल मूकाभिनय, चित्रकला, माती काम, व्यंगचित्र, रांगोळी, छायाचित्र आधी विषयाची स्पर्धा होणार आहे.